आ.संजयमामा शिंदे यांच्या गाव भेट दौऱ्याचे फलित… वंचित गावासाठी जिल्हा नियोजन मंडळामधून 5 कोटी 53 लाखाची तरतूद …
करमाळा – माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी 8 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये करमाळा – माढा मतदारसंघातील 152 गावातील वाडी वस्त्यांचा गाव भेट दौरा केला होता .या गाव भेट दौऱ्यामध्ये गावातील तसेच वाडी वस्तीवरील अडचणी समजून घेत असताना प्रत्येक गावातील शाळा, अंगणवाडी, स्मशानभूमी ,रस्ते ,व्यायाम शाळा , अल्पसंख्यांक मुस्लिम समाज , दलित वस्त्या यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्याच्या नोंदी केल्या गेल्या. या माहितीचे दृश्य परिणाम म्हणून 20 22 – 23 च्या जिल्हा नियोजन मंडळामधून करमाळा तालुक्यासाठी तब्बल 5 कोटी 53 लाखाची तरतूद करताना तालुक्यातील वंचित गावांना व दुर्लक्षित वाडीवस्तीवरील कामांना प्राधान्य देण्यात आले.
जिल्हा नियोजन मंडळामधून रावगाव, शेलगाव क ,मिरगव्हाण, व कविटगाव या गावांमध्ये बंदिस्त व्यायाम साहित्य साठी प्रत्येकी 5 लाख रुपये ,लव्हे आणि भाळवणी या 2 गावासाठी खुले व्यायाम साहित्य साठी 10 लाख, समाज कल्याण विभागाअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे या शीर्षकांतर्गत तालुक्यातील तब्बल 81 ग्रामपंचायत साठी 3 कोटी 10 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली या निधीमधून काँक्रीट, रस्ता, बंदिस्त गटार, पेविंग ब्लॉक आदी कामे केली जाणार आहेत .
30 54 हेड अंतर्गत तालुक्यातील कुंभारगाव ते घरतवाडी, कुस्करवाडी ते इजीमा रस्ता ग्रामा 18, रावगाव दगडवाडी ते शेळके वस्ती वाघमारे वस्ती रस्ता अशा 5 रस्त्यांसाठी 50 लाख रुपये, अल्पसंख्यांक विभाग अंतर्गत मुस्लिम कब्रस्तानांच्या संरक्षण भिंत बांधणे, अंतर्गत रस्ता यासाठी वडगाव उत्तर ,उमरड, कंदर, जातेगाव, रावगाव येथे प्रत्येकी 7 लाख याप्रमाणे 35 लाख निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत तालुक्यातील वीट, जिंती ,कोळगाव, पांगरे, जेऊर ,दहिगाव ,हिंगणी या गावांसाठी 60 लाख असा विकास निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
जिल्हा नियोजन मंडळाच्या सदर मंजूर निधी मधून वाडी वस्तीवरील निकडीचे व दुर्लक्षित अशी कामे होण्यास मदत होणार आहे .
