राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोलापूर जिल्हा ग्रामीण च्या मुलाखती संपन्न 8 दिवसात जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष , शहराध्यक्ष सह जिल्हा कार्यकारणी प्रसिद्ध करणार – जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड
करमाळा प्रतिनिधी
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तालुकाध्यक्ष/ शहराध्यक्ष सह जिल्हा कार्यकारिणीवर इच्छुक असलेल्या युवक कार्यकर्त्यांच्या मुलाखती पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष श्री. राकेश नाना कामठे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल सोलापूर येथे संपन्न झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्ह्यातील 11 तालुक्यातून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात युवक कार्यकर्ते मुलाखती साठी राष्ट्रवादी संपर्क कार्यालय सोलापूर येथे आले होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले कि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब , प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज दादा चव्हाण आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात बूथ कमिटी, प्रत्येक गावा-गावात शाखा, घर तिथे राष्ट्रवादी, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात युवक मेळावे, क्रिडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक असे वेगवेगळे उपक्रम राबवून या सर्व युवक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सक्रिय काम करून जास्तीत जास्त आमदार या जिल्ह्यातून विधानसभेत पाठवण्याचे काम आम्ही युवक करणार आहोत. तसेच सर्वसामान्य युवक कार्यकर्त्यांना संघटनेत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार घरोघरी पोहचविण्याचे काम आम्ही करणार आहोत. या मुलाखती वेळी युवक प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे, प्रदेश सरचिटणीस खलील शेख, सोलापूर जिल्हा युवक कार्याध्यक्ष अक्षय भांड, सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश चे दशरथ सोनवणे तसेच जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. येत्या 8 दिवसात संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी निवडणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांनी सांगितले
