Sunday, April 20, 2025
Latest:
करमाळाताज्या घडामोडीसकारात्मक

करमाळा उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी भुलतज्ञांची नेमणूक करण्याची कै.बाबुराव(तात्या) गायकवाड प्रतिष्ठानची मागणी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात भुलतज्ञांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी कै.बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठानच्यावतीने करमाळा तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे भुलतज्ञ नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून भूलतज्ञ नसल्यामुळे बाहेरगावचा भूलतज्ञ बोलावून ऑपरेशन करावे असल्यामुळे अनेक रुग्णांना वेळेवर भुल देऊन उपचार करण्यास उशीर झाल्यामुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.त्यामुळे करमाळा शहर व तालुक्यातील नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन लवकरात लवकर कायमस्वरूपी भुलतज्ञांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी कै. बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठानने केली आहे. यावेळी कै.बाबुराव( तात्या) गायकवाड प्रतिष्ठानचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group