पर्यावरणाच्या आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी सिल्व्हर ओकची गरज आहे- ॲड. अजित विघ्ने
करमाळा प्रतिनिधी राज्याचेे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार साहेब यांच्या २२ जुलै रोजी असणाऱ्या आणि आमदार संजयमामा शिंदे यांच्या ३१ जुलै रोजीच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन मौजे. केत्तुर नं-२ ता. करमाळा येथे वृक्षारोपन करण्यात आले. याप्रसंगी *सिल्व्हर ओक* या *ऑक्सिजन* देणारी झाडे लावण्यात आली. याप्रसंगी केत्तुर येथील ज्येष्ठ नागरिक श्री. दादासाहेब निकम, कृषीनिष्ठ आबासाहेब ठोंबरे, वैष्णवी कलेक्शनचे प्रो प्रा नवनाथ फाळके, पंडीतराव माने, विशाल मोरे, महावीर राऊत, महानवर सर यांचेसह अनेक ग्रामस्थ हजर होते. सिल्व्हर ओक या झाडापासुन ऑक्सिजन जास्त मिळतो त्यामुळे या झाडांचा सावली बरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत होते, त्यामुळे ही झाडे जास्तीत जास्त लावण्याचा संकल्प केल्याचे याप्रसंगी ॲड. अजित विघ्ने यांनी सांगितले. वस्तुतः सिल्व्हर ओक नावाने देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांचा बंगला देखिल प्रसिद्ध आहे. आणि या झाडाचे नाव साधर्म्याने सिल्व्हर ओक आहे.. म्हणुन खऱ्या अर्थाने पर्यावरणा करिता आणि लोकशाहीच्या रक्षणाकरीता आता सिल्व्हर ओक ची गरज आहे.. असे सुचक वक्तव्य ॲड. अजित विघ्ने यांनी केले आहे.
