घारगावचे सुपुत्र संजय सरवदे यांचा समर्थनम ट्रस्ट फॉर द डिसेबल्ड या संस्थेकडून आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मान
पुणे वाघोली येथील समर्थन ट्रस्ट फोर द डिसेबल्ड या संस्थेच्या वतीने अपंग वंचितांसाठी व युवकांसाठी समावेशक मोफत रोजगार मेळावा व प्रशिक्षण कार्यक्रम भरविण्यात आला होता ही संस्था विविध समावेशक आणि नाविन्यपूर्ण कार्यक्रमाद्वारे अपंगत्व वंचितांना सक्षम बनवणे यासाठी काम करते हा रोजगार मेळावा साकार करण्यासाठी संजय सरवदे यांनी श्री तुषार सरांना निस्वार्थपणे मदत सहकार्य केले त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गेनबा सोपानराव मोझे कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेजचे प्राचार्य श्री ओसवाल सर आणि श्री संजय सरवदे व समर्थनम ट्रस्ट फोर द डिसेबल्ड या संस्थेचे श्री तुषार सर व डॉक्टर विशाल पाटील सर मोझे कॉलेज ऑफ फार्मसी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यांच्या उपस्थितीमध्ये संजय सरवदे यांना श्री ओसवाल सर प्राचार्य मोझे कॉलेज ऑफ फार्मसी व ट्रस्टचे श्री तुषार सर व जयश्री मॅडम यांच्या हस्ते ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन समाजसेवक म्हणून गौरवण्यात आले यावेळी अनेक उमेदवारांना समर्थनम ट्रस्ट फॉर द डिसेबल्ड या संस्थेने रोजगार उपलब्ध करून नोकरी मिळून दिली त्याबद्दल संस्थेचे मनापासून आभार मानले यावेळी अनेक विद्यार्थी विद्यार्थीनींनी व अनेक कंपनीने अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होते.
