शेती ही एक प्रयोगशाळा आहे – डॉ. सतीश करंडे
करमाळा करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर , संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , महाविद्यालय प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील , कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य , कॅप्टन संभाजी किर्दाक यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार MKCL नॉलेज फाउंडेशन पुणे व संजीवनी स्वावलंबी शेती प्रकल्प , सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे रोशेवाडी , तालुका करमाळा येथील प्रगतशील शेतकरी निलेश मोरे यांच्या शेतीवर आयोजित शिवार फेरी प्रसंगी डॉ. सतीश करंडे यांनी शेती एक प्रयोगशाळा आहे असे गौरवोद्गार काढले. निलेश मोरे यांच्या अडीच एकर शेतीच्या तुकड्यावर एकूण 15 पिके पेरली आहेत. ती सर्वच पिके खूप चांगल्या स्थितीत आहेत. मातीची सुपीकता वाढवून जमिनीला संजीवनी देणे , पीक विविधता वाढवून कीड व रोगाचे व्यवस्थापन करणे या तत्त्वावर ही शेती केली जाते . बहुपिक पद्धतीमुळे अन्नसुरक्षा व पोषण सुरक्षा तर मिळतेच त्याचबरोबर कृषी पर्यावरण तयार होऊन नैसर्गिकरित्या पिकांची वाढ होते. महाविद्यालयातील 11 वी. विज्ञान विभागातील पिकशास्त्र विषयांचे 67 विद्यार्थी शिवार फेरीत सहभागी झाले होते. या शिवार फेरीचे नियोजन विज्ञान कनिष्ठ विभाग प्रमुख व एन .एस .एसचे जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख , प्रा.सुवर्णा कांबळे , प्रा. आनंद शेळके , प्रा. अनिता अधोरे , प्रा. डॉ. हरिदास बोडके यांनी केली. या शिवार फेरीप्रसंगी प्रा. गजेंद्र कुलकर्णी स्वावलंबी शेती प्रकल्प सोलापूर , सामाजिक कार्यकर्ते आजिनाथ मोरे , गजानन साळुंखे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
