शिवसेना शिंदे गटाच्या करमाळा तालुकाप्रमुखपदी देवानंद बागल
करमाळा प्रतिनिधी माजी आमदार नारायण पाटील गटाचे समर्थक देवानंद बागल यांची शिवसेनेच्या (शिंदे गट) करमाळा तालुका प्रमुख पदी निवड झाली आहे. त्यांना संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांच्या हस्ते सचिव संजय मोरे यांच्या सहीचे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. यावेळी जिल्हा प्रमुख महेश चिवटे उपस्थित होते. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही निवड केली असल्याचे या पत्रात म्हटले आहे. १ वर्षासाठी ही निवड असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
