Saturday, April 26, 2025
Latest:
आध्यात्मिककरमाळा

करमाळा तालुक्यातील घारगाव येथील पोतराज बाबा देवस्थानाची २३ मे रोजी यात्रा भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे संजय सरवदे यांचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी  घारगाव आणि घारगाव परिसरातील पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांना आग्रहाचे निमंत्रण देण्यात येते की गवळी पोतराज बाबा यात्रा वैशाख पौर्णिमा दिनांक २३ मे २०२४ गुरुवार रोजी दुपारी दीड वाजता आहे तरी सर्व ग्रामस्थ, भक्त भाविक यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे तरी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी भक्तांनी उपस्थित राहावे व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन संजय सरवदे यांनी केले आहे.   घारगाव येथील गवळी पोतराज बाबांच्या समाधीला ५६ वर्ष झाली आहेत भाविकांना आज त्याची प्रचिती येत आहे.संजय सरवदे यांचे आजोबा एकनाथ यांना गवळी पोतराजाने दर्शन दिले असुन ही सेवा करीत बापुना प्रत्यक्ष दर्शन दिले.त्यानंतर बापु सरवदे सेवा करीत होते. अनेक लोकांच्या अडीअडचणी पोतराज बाबा समाधीच्या दर्शनाने पुर्ण होतात अशी भाविकांची श्रध्दा आहे. करमाळा तालुक्यातील घारगाव येथे पोतराज बाबा नावाचे देवस्थान असून सुमारे एक दशकापासून या देवस्थानाची प्रचिती भाविकांना येत आहे घारगाव येथील बापू सरवदे यांचे वडील एकनाथ सरवदे यांना झाडाखाली पोतराज बाबाच्या रूपाने नागदेवतेचे दर्शन झाले होते त्यावेळी पासून त्यांनी पोतराज बाबाची सेवा करण्याची व्रत जपले पोतराज देवस्थानाची सेवा करू लागले हळूहळू पोतराज बाबाच्या कृपेने भाविकांच्या दर्शनाने मात्र समस्या दूर होऊ लागल्या पोतराज बाबाच्या या समाधीला आता ५६ वर्षे पूर्ण झाले या समाधीची पडझड झाली होती परंतु भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पोतराज देवस्थानचा जीर्णोद्धार करण्यासाठी घारगावचे सुपुत्र संजय सरवदे व त्यांच्या कुटुंबाने पुढाकार घेतला व गेल्या वर्षी एक लाख नऊ हजार दोनशे एकोणीस रुपये खर्च करून भाविक भक्ताच्या सहकार्यानेच या समाधीचा जिर्णोद्धार केला आहे या समाधीचा जिर्णोद्धार एक व्यक्ती ही करू शकतो परंतु सर्वांचा वाटा सर्वांना त्याचे पुण्य मिळावे म्हणून आम्ही प्रत्येकाकडून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून देणगी घेऊन जिर्णाध्दाराचे काम पूर्ण केले असल्याचे संजय सरवदे यांनी सांगितले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group