वादळ वाऱ्याने नुकसानग्रस्त फळबागा आणि पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी- ॲड. अजित विघ्ने( प्रवक्ता- राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट करमाळा- माढा )
करमाळा प्रतिनिधी- करमाळा व माढा भागातील शेतीचे वादळ वाऱ्याने व आवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झालेले असुन, काही ठिकाणी प्रचंड प्रमाणात फळबागांचे नुकसान झालेले असुन, करमाळा शहर व ग्रामिण भागात देखिल घरादारांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना तातडीची मदत देण्याची आवश्यकता आहे. सध्या निवडणुकीची आचारसंहीता चालु आहे परंतु अशा प्रकारच्या आपतकालिन परिस्थितीत अधिकारी वर्गानी तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे. सदर परिस्थितीची माहिती आमदार. संजयमामा शिंदे यांना दिलेली असुन संबधित अधिकारी यांना याबाबतच्या सक्त सुचना दिलेल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांनी तात्काळ नुकसानीची माहिती संबंधित तलाठी, ग्रामसेवक, मंडल अधिकारी, मुख्याधिकारी यांना दयावी असे आवाहन करण्यात येत आहे.
