प्राध्यापक धनंजय पन्हाळकर यांना राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान
करमाळा प्रतिनिधी
प्राध्यापक धनंजय पन्हाळकर यांचे मुळगाव नेरले तालुका करमाळा हे असून ते सध्या देवगड येथील श्रीमती न. शा. पंतवालावलकर महाविद्यालयामध्ये गणित विषयाचे प्राध्यापक म्हणून काम करत आहे,त्यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन महात्मा ज्योतिबा फुले इतिहास अकादमी महाराष्ट्र या संस्थेने त्यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.प्राध्यापक पन्हाळकर सर 29 वर्ष गणित या विषयाचे अध्यापन करत आहे,गणित विषयाचा नेहमी शंभर टक्के निकाल लागत आहे, तसेच त्यांच्या विद्यार्थ्यांना गणित या विषयात१०० पैकी १००गुण मिळाले आहेत.आयआयटी जेईई परीक्षेचे मार्गदर्शन करणे त्याचबरोबर पर्यावरण संवर्धन या विषयावर अनेक लेख प्रसिद्ध, बालभारती अभ्यास मंडळ पुणे चे सदस्य म्हणून काम केले आहे,इयत्ता अकरावी व बारावी गणित विषयाचे पुस्तक लेखन करण्याचे काम त्यांनी केली आहे. अनेक राज्यस्तरीय मार्गदर्शन शिबिरामध्ये त्यांनी रिसोर्स पर्सन म्हणून काम केले आहे त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू आहे . तसेच पर्यावरण संवर्धनासाठी संवर्धनासाठी तुळशीनगर येथील घराच्या परिसरात चिमण्यांसाठी घरटे बांधले आहे,तसेच त्यांना अन्न पाण्याची सोय केली आहे. गेले पंधरा वर्षे या घरट्यातून अनेक पिल्लांनी आकाशामध्ये उंच भरारी घेतली आहे.लोकसंख्या दिन, अन्नसुरक्षा, अण्णाभाऊ साठे ,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले अशा अनेक विषयांवर व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेत त्यांना महात्मा फुले,सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार माननीय चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते बालगंधर्व नाट्यमंदिर पुणे येथे प्रदान करण्यात आला, त्यांना पुरस्कार भेटल्याबद्दल अनेक स्तरांमधून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
