Sunday, April 20, 2025
Latest:
करमाळाराजकीय

कुंभारगाव ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी उद्योजक जांलीधर बापु पानसरे यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम विकास पॅनलच्यावतीने निवडणुक लढणार

कुंभारगाव प्रतिनिधी करमाळा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून कुंभारगावचे विकासरत्न कृषी उत्पन्न बाजारसमिती मा.उपसभापती उद्योजक जालींधर बापु पानसरे मार्गदर्शनानुसार कुंभारगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये श्री जालिंदरशेठ पानसरे यांच्या नेतृत्वाखाली सप्ताल वामनराव आढाव, विकास बाळासाहेब पानसरे, बाळासाहेब विलास गलांडे व बाळासाहेब भगवान पानसरे पुरस्कृत श्रीराम विकास पॅनलच्या माध्यमातून कुंभारगावच्या सर्वांगीण विकास साठी उमेदवारांनी निवडणुकीसाठी नॉमिनेशन फॉर्म सादर केले आहे.जालींधर बापु पानसरे यांनी गावासाठी सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रमाद्वारे भरीव असे योगदान दिले असुन गावातील शाळा रस्ता पाणी वीज या प्रश्नाबरोबर अध्यात्माला विशेष प्राधान्य देऊन हरीनाम सप्ताहाच्या आयोजनाबरोबर मंदिराचा जिर्णाध्दार केला आहे.कुंभारगावातील जनतेप्रती त्यांचे विशेष असे प्रेम असुन जनतेच्या आग्रहावास्तव गावच्या विकासासाठी श्रीराम विकास पॅनल‌ निवडणुक लढवीत आहे.यामध्ये सरपंच पदासाठी सुनिता रामदास पोळ प्रभाग क्रमांक एक मध्ये मच्छिंद्र शंकर पानसरे सौ काजल राहुल पानसरे सौ सिंधुबाई आजिनाथ पोळ प्रभाग क्रमांक दोनसाठी शशिकांत विष्णू कुंभार सो मंदा ज्ञानेश्वर पवार सौ .रतन वामनराव आढाव तर प्रभाग क्रमांक तीन साठी श्री बाबुराव भिकाजी भोसले श्री आजिनाथ रामदास गायकवाड श्री संदीप रोहिदास गाडेे सौ . सुनीता सुभाष सव्वा लाख या उमेदवारांनी कुंभारगाव ग्रामपंचायत साठी नामनिर्देशन दाखल केले आहे.गटातटाच्या राजकारणापेक्षा गावचा सर्वांगीण विकास हेच ध्येय ठेवून समविचारी असणाऱ्या राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणाऱ्या उमेदवारांना या निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली असून कुंभार गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत श्रीराम पॅनलचा विजय निश्चित आहे असे मत श्रीराम विकास पॅनलचे प्रमुख जालिंदर शेठ पानसरे यांनी सांगितले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group