विद्या विकास मंडळ सचिव विलासराव घुमरे सरांना शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मान
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा
या महाविद्यालयातील शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीच्या निमित्ताने विद्या विकास मंडळाचे सचिव मा. विलासरावजी घुमरे सर यांना शिक्षण क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन मंगळवेढा येथून प्रकाशित होणाऱ्या दामाजी एक्सप्रेस या दैनिकाच्या वतीने वेगवेगळे पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते. यावेळी मा.विलासराव घुमरे यांच्या ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी पाहू दामाजी एक्सप्रेस यांनी शिक्षणक्षेत्रातील शिक्षणरत्न हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराचा स्वीकार सुपुत्र विद्या विकास मंडळाचे विश्वस्त व युवाउद्योजक आशुतोष घुमरे , संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड व उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक यांनी स्वीकारला. हा पुरस्कार सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे सर यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी व्यासपीठावर युवा नेते शंभूराजे जगताप जिल्हाप्रमुख महेश चिवटे सुजीत बागल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
