छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून हिंदू मुस्लिम एकात्मतेचे अनोखे दर्शन शिवरायांचा विचार खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत पोहोचला – ज्योतीराम गुंजवटे
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य मिरवणूक जामा मस्जिद समोरून जात असताना करमाळा तालुक्यातील मुस्लिम बांधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून एकात्मतेचे दर्शन दिसून आले असे मत करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी व्यक्त केले . छत्रपती शिवाजी महाराज एकात्मतेचे प्रतीक होते हे या आजच्या मिरवणुकीतील कृतीने दिसून आले ही मानवता छत्रपती शिवाजी महाराजांनीच शिकवली याच मानवतेवर करमाळा तालुक्यातील मुस्लिम बांधव चालतोय याचा मला अभिमान वाटतो.श्री गणेशोत्सवामध्ये सुद्धा हिंदू मुस्लिम बांधव या उत्सवामध्ये एकत्र सहभागी होतात जामा मस्जिद वरून मानाच्या गणपतीवर पुष्पवृष्टी केली जाते हे उदाहरणही संपूर्ण देशाला आदर्श एकात्मतेचे दर्शन घडवणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजाच्या लढाया कुठल्या धर्माविरुद्ध नव्हत्या कोणत्या जातीविरुद्ध नव्हत्या कोणत्या वर्णभेदा विरुद्ध नव्हत्या तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाया या जुलमी अन्यायानविरुद्ध होत्या .त्या राजकीय लढाया होत्या त्यामुळे छत्रपती शिवराय हे स्वराज्य निर्माते ठरले या स्वराज्याचा अनमोल धागा म्हणजे सर्वधर्मसमभाव यात कोणताच भेद नाही हेच छत्रपतींच्या स्वराज्याचे वैशिष्ट्य आहे आणि आम्ही त्याच स्वराज्याचे मावळे आहोत याचा आम्हाला अभिमान आहे .रक्ताच्या नात्यापेक्षा मानवतेचे विश्वासाचे विचाराचे नाते कधी पण श्रेष्ठच असते करमाळ्यात हम सब एक है हिंदू-मुस्लीम भाई – भाई असल्याचे चित्र पाहायला मिळते .
