करमाळा तालुक्याचे युवा नेते- शंभूराजे जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली किंग्ज फाउंडेशन मार्फत देवीचा माळ येथे स्वच्छता अभियान उत्कृष्टरीत्या संपन्न…
करमाळा प्रतिनिधी
*करमाळा शहरापासून साधारण 1.6 किलोमीटर अंतरावर असणारे देवीचामाळ हे गाव करमाळ्याची आराध्य देवता आई कमलाभवानी साठी प्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वी नुकताच नवरात्र उत्सव व देवीची यात्रा या ठिकाणी संपन्न झाली. यानिमित्ताने करमाळा तालुक्यातून लाखोच्या संख्येने दर्शनासाठी भक्त या ठिकाणी येत असतात. नवरात्र उत्सव व यात्रा संपन्न झाल्यानंतर शंभूराजे जगताप यांनी आपले सहकाऱ्यांसोबतव सहज देवीचा माळ या ठिकाणी भेट दिली असता आई* *कमलाभवानी मातेच्या मंदिर परिसरात व देवीचामाळ गावाच्या परिसरात बऱ्याच ठिकाणी कागदे,प्लास्टिक कचरा, दिसून आला. कमलाभवानी मातेची जगताप घराण्यावर सदैव कृपा व आशीर्वाद असल्याने*
*2 डिसेंबर 2022 रोजी शंभूराजेंचा वाढदिवसानिमित्त किंग्ज फाउंडेशनमार्फत देवीचा माळ या गावात, मंदिर परिसर खंडोबा मंदिर, 96 पायऱ्याची विहीर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. आई कमला भवानीचे दर्शन घेऊन या स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. स्वतः शंभूराजे या स्वच्छता अभियानात लिड रोलला होते. ही एक समाजसेवा व एक उत्तम कार्य असल्याने करमाळा शहरातून व तालुक्यातून मोठ्या संख्येने युथ/युवा वर्ग या अभियानात सहभागी झाला. सर्वांनी अवघ्या काही तासातच देवीचामाळ परिसर कचरा मुक्त केला व सर्वत्र स्वच्छता दिसू लागली. या स्वच्छता अभियानास देवीचामाळ ग्रामपंचायतीचे विशेष सहकार्य लाभले. देवीचा माळ ग्रामपंचायतीने शंभूराजे जगताप यांचे विशेष आभार मानत त्यांचा सत्कार केला. त्यांच्या सहकाऱ्यांचे व सहभागी झालेल्या सर्व युवा मुलांचे देवीचामाळ परिसर कचरा मुक्त केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. ग्रामपंचायत तर्फे सर्वांसाठी नाश्त्याची सोय करण्यात आली होतीी.
