Thursday, April 17, 2025
Latest:
करमाळासकारात्मक

पांगरे ग्रामपंचायतीतर्फे आजी-माजी सैनिक व माता पिता यांचा सन्मान*

करमाळा प्रतिनिधी पांगरे ग्रामपंचायतीतर्फे आजी-माजी सैनिक व सैनिक माता पिता यांचा सन्मान देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य वर्षा निमित्त आज दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले त्यानिमित्त देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष विविध कार्यक्रमाने साजरा केले जात आहे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी व स्वातंत्र्यानंतर देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी ज्यांनी कष्ट केले व सध्या देशाच्या सीमेचे रक्षण करत आहेत अशा सर्व गावातील आजी-माजी सैनिकांचा व सध्या देशाच्या सेवेत कार्यरत असलेले आज ते सन्मानासाठी उपस्थित राहु शकले नाहीत अशा सैनिक यांचे माता पिता यांचा सन्मान करण्यात आला. यानिमित्ताने देशाच्या रक्षणासाठी आपला अनमोल काळ देऊन देशाच्या सीमा सुरक्षित ठेवुन देश सेवा केली ज्यायोगे आपण देशामध्ये सुरक्षित आहोत असे माजी सैनिक मेजर श्री ज्योतीराम तोबरे, श्री रामराव पारेकर-पाटील, श्री महादेव तोबरे व श्री अनील दोंड तसेच आज देशाच्या सेवेमध्ये कार्यरत असलेले श्री अक्षय गव्हाणे यांचे माता व पिता श्री महादेव गव्हाणे यांचा शाल, फेटा, सन्मान चिन्ह व नारळाचे रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक ॲड. दत्तात्रय सोनवणे, मा.उपसरपंच सचिन पिसाळ, सदस्य भैरवनाथ हराळे, संध्या मुरूमकर, विवेक पाटील, ग्रामसेवक समाधान कांबळे,शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष जोतिराम गाडे-पाटील, पोलीस पाटील युवराज सावंत, माजी सदस्य ज्ञानेश्वर गुटाळ, नागेश वडणे, तुकाराम पिसाळ, पोपट सातपुते, देविदास टेकाळे, गोपाळ कोळी, मच्छिंद्र उघडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group