कामगार नेते स्व सुभाष आण्णा सावंत यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबीराचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी कामगार नेते स्व. सुभाष अनंतराव सावंत यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (ता. १ मे) आरोग्य शिबीर होणार आहे. पोथरे नाका येथील करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील हमाल भवन येथे सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत हे शिबीर होणार आहे. करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. करमाळा तालुका हमाल पंचायत व सावंत गल्ली येथील छत्रपती शिवाजी तरुण मंडळ यांच्या वतीने हे शिबीर होणार आहे, याचा लाभ गरजुंनी घ्यावे, असे आवाहन करमाळा पंचायत समितीचे माजी सदस्य ॲड राहुल सावंत यांनी केले आहे.
