करमाळा

करमाळा नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवार दि .10 नोव्हेंबर रोजी पहिल्या दिवशी एकही उमेदवाराचा अर्ज दाखल नाही – सचिन तपसे

करमाळा प्रतिनिधी करमाळा नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवार दि .10 नोव्हेंबर रोजी पहिल्या दिवशी एकही उमेदवाराचा अर्ज दाखल नाही – सचिन तपसे
करमाळा प्रतिनिधी करमाळा नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी एकही उमेदवाराचा अर्ज दाखल नाही अशी माहिती करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन तपसे यांनी दिली आहे. करमाळा नगरपालिका पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून दिनांक 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या कालावधीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असून आज सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस असल्याने उमेदवार मोठ्या उत्साहाने अर्ज दाखल करतील अशी अपेक्षा होती परंतु करमाळा नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये आज एकाही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही एक तर प्रचाराला कालावधी कमी असल्याने .सर्वाधिक अर्ज दाखल होती अशी अपेक्षा होती परंतु अपक्ष तसेच गटातटाच्या जोरावर निवडणूक लढवणाऱ्यांना चिन्हांचे वाटप 26 नोव्हेंबरला होणार असल्याने तसेच पाच सूचकाची गरज असल्याने प्रचाराला कमी वेळ मिळणार असल्याने या उमेदवाराची मोठी पंचायत झाली आहे त्यामुळे पक्षाने मान्यता दिलेला उमेदवारी असेल तर त्याला लगेच चिन्हही मिळेल तसेच प्रचार करता येईल तसेच सूचकही एक लागत असल्याने पक्षाने उमेदवारी दिल्याशिवाय उमेदवार आपला अर्ज अपक्ष दाखल करण्यासाठी पुढे यायला तयार नसल्याचे चित्र आज पाहायला मिळाले आहे करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन तपसे यांनी सोमवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी नगरपालिका नगरसेवक पदासाठी तसेच नगराध्यक्ष पदासाठी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नसून निरंक असल्याचे सांगितले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!