करमाळा

विकासाभिमुख लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी करमाळा शहर विकास पॅनल कटीबद्ध इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधण्याचे कुणाल पाटील यांचे आवाहन


करमाळा, प्रतिनिधी – वेगवेगळ्या पद्धतीने निवडणूक लढवून निवडणूक झाल्यानंतर केवळ सत्ताकारणासाठी एकत्र येणाऱ्या लोकप्रतिनिधींपेक्षा शहराच्या विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकप्रतिनिधींची शहराला निकडीची गरज असून या दृष्टीने निर्माण करण्यात आलेल्या करमाळा शहर विकास पॅनलला जनतेतून प्रचंड पसंती आहे. त्यामुळे विकासाभिमुख लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी उमेदवारीसाठी संपर्क करण्याचे आवाहन करमाळा शहर विकास पॅनलचे प्रवर्तक कुणाल पाटील यांनी केले आहे.याबाबत अधिक बोलताना पाटील यांनी सांगितले आहे की, एकेकाळी जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभुत्व गाजविलेल्या करमाळा तालुक्याच्या निवडणुका या तालुक्या बाहेरील नेतृत्वाच्या अधिपत्याखाली मॅनेज केल्या जातात. यामध्ये केवळ सत्ताकारणाच्या वाटाघाटी होतात मात्र शहर किंवा तालुक्याच्या विकासाबाबत कोणताही हितकारक निर्णय या नेतृत्वाकडून झाल्याचे अद्याप पर्यंत दिसून येत नाही. यामुळे जनतेत प्रचंड नाराजी असून विकासाभिमुख राजकारणासाठी तालुक्याला तसेच शहराला स्वतंत्र विचाराच्या नेतृत्वाची गरज आहे. राजकीय पक्ष केवळ सोयीनुसार राजकारण करत असल्यामुळे शहर व तालुक्याचा विकास खुंटला आहे. ही प्रथा मोडून काढण्यासाठी करमाळा शहर विकास पॅनलची निर्मिती करण्यात आली असून यासाठी परिवर्तनवादी उमेदवारांना करमाळा शहर विकास पॅनल संधी देणार आहे.त्यामुळे करमाळा नगरपालिकेवर विकासाभिमुख आणि परिवर्तनवादी लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असलेल्या इच्छुक उमेदवारांनी करमाळा शहर विकास पॅनलच्या जुना बायपास रोड येथील संपर्क कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करमाळा शहर विकास पॅनलचे प्रवर्तक कुणाल पाटील यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!