Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळाताज्या घडामोडी

करमाळा भाजपाचे मंदिर खुले करण्यासाठी घंटानाद आंदोलन.

करमाळा प्रतिनिधी. महाराष्ट्र राज्यातील सर्व मंदिराची दारे खुले करण्यासाठी तसेच कुंभकर्णासारख्या गाढ झोपेत असलेल्या ठाकरे सरकारला जागे करण्याकरिता दार उघड उध्दवा दार उघड या घोषणेने करमाळासह राज्यभर भाजपाच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले.
सदर आंदोलन भाजपा तालुकाअध्यक्ष गणेश चिवटे, तालुकासरचिटणीस सुहास घोलप, तालुकाउपाध्यक्ष रामा ढाणे, जिल्हाउपाध्यक्ष किरण बोकन, तालुकायुवकअध्यक्ष सचिन गायकवाड, विस्तारक भगवान गिरीगोसावी, ओबीसीअध्यक्ष धर्मराज नाळे, किसानमोर्चाअध्यक्ष विजय नागवडे, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, प्रदीप ढेरे महाराज, विलास जाधव महाराज यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी घंटानाद करून निद्रिस्त ठाकरे सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या तसेच राज्यातील सर्व मंदिराची व मस्जिदिची दारे खुले करण्याची मागणी करण्यात आली. सदर निवेदन तहसीलचे निवासी नायब तहसीलदार बदे यांनी स्वीकारले. आंदोलनावेळी भाजपाचे मोहन शिंदे, डॉ. अभिजीत मुरूमकर, उदय भालेराव, काळे महाराज, मस्तान कुरेशी, बाळासो कुंभार, धनु किरवे, दीपक सवालके, अक्षय शिंदे, लक्ष्मण काळे, जयंत काळे, चेतन राखुंडे, पुष्पक ढेरे, राजू गुंड, दादा झाडबुके, नागेश गुरव, बाप्पू मोरे, राजेश ठोंबरे आदी उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group