Thursday, April 17, 2025
Latest:
आरोग्यकरमाळा

उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथील आरोग्य मेळाव्यात 435 रुग्णांची तपासणी

करमाळा प्रतिनिधी
उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे शुक्रवारी 22 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय आरोग्य मेळाव्यात 435 रुग्णाची तपासणी करून उपचार करण्यात आले.या आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन आमदार मा संजयमामा शिंदे यांचे हस्ते झाले.
या शिबिरात दंत चिकित्सक डॉ चंद्रकांत सारंगकर , बालरोग तज्ञ डॉ करंजकर, डॉ गायकवाड, स्त्रीरोग तज्ञ डॉ निलेश मोटे, अस्थीरोग तज्ञ डॉ दयानंद शिंदे, सर्जन डॉ संदेश शहा, नाक ,कान ,घसा तज्ञ डॉ अमोल घाडगे इत्यादी तज्ञांनी तपासणी केली. शिबीर यशस्वी करण्यासाठी मा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रदिप ढेले सरांचे माग्दर्शन लाभले. सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कठोर परिश्रम घेतले.
चौकट…
आरोग्य शिबिरात 435 रूग्णांची तपासणी करून उपचार करण्यात आले. तसेच 170 जणांना युनिक हेल्थ आयडी व आयुष्यमान भारत कार्डाचे वाटप करण्यात आले. 6 जणांनी देहदानाचा संकल्प केला .
डॉ अमोल डुकरे वैधकीय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय करमाळा.

चौकट…
उपजिल्हा रुग्णालयात आज महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आरोग्य शिबीर यशस्वी झाले. या रुग्णालयात अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असून आत्तापर्यंत मोफत सिझेरियन सुविधा, दिव्यांगांसाठी प्रमाणपत्र देण्याची सुविधा, डायलिसिसची सुविधा, डिजिटल एक्स-रे मशनरी ची सुविधा, कर्मचारी वसाहत बांधकामासाठी निधी, उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून 100 खाटांचे हॉस्पिटलसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. भविष्यकाळातही असेच उपजिल्हा रुग्णालयात नवनवीन अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे.
आमदार संजयमामा शिंदे

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group