करमाळासकारात्मक

श्री आशुतोष घुमरे, प्रा. लक्ष्मण राख व उपप्राचार्य संभाजी किर्दाक विविध पुरस्काराने सन्मानित

*करमाळा प्रतिनिधी  यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात श्री. आशुतोष घुमरे, प्रा. लक्ष्मण राख व उपप्राचार्य लेफ्टनंट संभाजी किर्दाक यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल महाविदयालयाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. सोलापूर येथे झालेल्या हिंदुस्थान पेट्रोलियमच्या कार्यक्रमात दिगंबररावजी बागल पेट्रोलियमला जिल्ह्यात सर्वाधिक डिझेल विक्री,सर्वाधिक पेट्रोल विक्री व सर्वाधिक ड्राईव्ह ट्रॅक कार्डचा वापर केल्याबद्दल प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विद्या विकास मंडळाचे विश्वस्त श्री. आशुतोष घुमरे यांना प्रदान करण्यात आले. तसेच कनिष्ठ विभागाचे राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तरचे कार्यक्रमअधिकारी व जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय आदर्श कार्यक्रमाधिकारी पुरस्कार तर उपप्राचार्य लेफ्टनंट संभाजी किर्दाक यांना उत्कृष्ट ANO पुरस्कार व कंदर शिक्षण प्रसारक मंडळ ,करमाळा यांचा तालुकास्तरीय आदर्श प्राध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल तिघांचेही संस्था व महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , सहसचिव श्री विक्रमसिंह सूर्यवंशी, प्रबंधक श्री कैलास देशमुख व यशवंत परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. आशुतोष घुमरे यांचे नियोजन व त्यांच्या कार्याच्या पद्धती, आणि कौशल्य यामुळेच त्यांना हा पुरस्कार मिळाला. तसेच प्रा. लक्ष्मण राख यांना त्यांची कार्यकुशलता, लोकांना आपलेसे करण्याची वृत्ती व आपले ध्येय पूर्ण करण्याची हातोटी यामुळे हा पुरस्कार मिळाला तर उपप्राचार्य लेफ्टनंट संभाजी किर्दाक यांना त्यांची चिकाटी, मेहनत करण्याची तयारी कोणतेही काम पूर्ण करण्याची वृत्ती, होतकरूपणा यामुळे हा पुरस्कार मिळाला म्हणजेच कष्टलाच फळ आहे याची प्रचिती यातून आलेली दिसते.
यावेळी प्रा. सौ. सुजाता भोरे, प्रा. नितीन तळपाडे, प्रा. लक्ष्मण राख व प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मुन्नेश जाधव यांनी केले तर आभार प्रा.सौ.मुक्ता काटवटे यांनी मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!