प्रशासकाचे नागरी सुविधा पुरविण्यासाठी दुर्लक्ष-नगरसेविका सौ.राजश्री माने
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहराकडे प्रशासकाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक नाराज झाले आहे अशी माहीती नगरसेविका राजश्री माने यांनी सांगितले आहे.रस्ता,गटारी,पाणी, समस्येने शहरवासी हैराण झाले आहे.करमाळा नगरपालिकेने कानाड गल्लीत येथे 12 ते 13 लाखापर्यंत पाणी पुरवठा योजना केली जे काम केले ते व्यवस्थित झालेली नाही ते काम केल्यानंतरही लोकांना पुरेसे पाणी पुरवठा होत नाही .कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे तरी संबंधित ठेकेदाराने त्या कामाची दखल घेऊन कुठे अडचण येत आहे त्या अडीअडचणी सोडवाव्यात शहरात जेव्हापासून प्रशासन आले आहे तेव्हापासुन ते करमाळा शहरात फिरले नाही अडीअडचणी तपासून त्यांनी कुठलीच दखल घेतली नाही सध्या पाणी, गटारी, रस्ता ह्या तिन्ही गोष्टी नागरिकांसाठी मूलभूत गरजा आहे तिन्ही गोष्टीकडे दूर्लक्ष होत आहे त्यांनी सगळ्या अडचणी सोडवल्या पाहिजे प्रशासन अधिकारी समस्या कडे डोळेझाक करीत आहे माहितीच नाही काय चाललय ते मला अस वाटतं की त्यांनी सगळ्यांनी आपली जबाबदारी समजून लक्ष घालून करमाळा शहराच्या समस्या अडचणी सोडवाव्यात नाहीतर प्रशासन विरोधात आंदोलन करणार असा ईशारा नगरसेविका राजश्री माने यांनी दिला आहे.
