वाशिंबे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत तुकाराम डोंबाळे बिनविरोध
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील वाशिंबे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत तुकाराम भगवान डोंबाळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे.
राजेंद्र भगवान डोंबाळे यांच्या निधनामुळे वाशिंबे ग्रामपंचायतीत एक जागा रिक्त झाली होती. त्या जागेसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यामध्ये त्यांचे बंधु तुकाराम भगवान डोंबाळे यांच्या नावावर पाटील गटाचे नवनाथ झोळ, शिंदे गटाचे तानाजी झोळ, बागल गटाचे गणेश झोळ यांचे एकमत झाले व त्यांचा एकमेव अर्ज दाखल केला. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व ग्रामस्थांनी डोंबाळे यांचे अभिनंदन केले आहे.
