आदिनाथचे मा.संचालक ॲड दत्तात्रय सोनवणे यांचा अनावश्यक खर्चाला फाटा देत वाढदिवस साजरा.
करमाळा प्रतिनिधी
पांगरे येथील प्रतिष्ठित नागरिक व श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक ॲड. दत्तात्रय सोनवणे यांनी पांगरे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन मुलांना खाऊ वाटप करून व शाळेमध्ये सुशोभिकरण करण्यासाठी झाडे भेट देऊन आपला वाढदिवस साजरा केला. ॲड. सोनवणे यांच्या या उपक्रमामुळे लोकांना आपले वाढदिवसा सारखे कार्यक्रम साजरा करत असताना समाज उपयोगी अशा गोष्टी होतील व नवीन पिढीसाठी काहीतरी उपयोगी ठरतील अशा गोष्टी करुन आपले वाढदिवसा सारखे कार्यक्रम साजरी करण्याची प्रेरणा मिळेल. ॲड. सोनवणे यांनी शाळेमध्ये जाऊन मुलांमध्ये मिसळून लहान मुलांना प्रेरणादायी अशा काही गोष्टी सांगून आपला वाढदिवस मुलांबरोबर साजरा केला. याप्रसंगी गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये गावचे उपसरपंच श्री गणेश वडणे, माजी उपसरपंच श्री सचिन पिसाळ, श्रीराम बचत गटाचे अध्यक्ष श्री जोतीराम गाडे पाटील, आण्णा गुंजाळ, तुकाराम पिसाळ, नागेश वडणे, शिवराज मणेरी, तुषार दोंड, दादा गुटाळ, कैलासगुटाळ, सुधिर दोंड, सतिश भगत, विष्णु जाधव असे अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा वाढदिवसानिमित्त साध्या पद्धतीने सत्कार करण्यात आला.
