Monday, April 21, 2025
Latest:
करमाळाताज्या घडामोडीराजकीय

वाशिंबे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रामदास झोळ सरांची भुमिका निर्णायक झोळ सोडुन सर्वसमावेशक भानुदास टापरे नावाला बिनविरोधसाठी पंसदी

वाशिंबे प्रतिनिधी वाशिंबे ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी वाढली आहे. आतापर्यत झोळ सोडुन या निवडणुकीत कुणाची एकाची सत्ता नव्हती. वाशिंबे ग्रामपंचायतीवर झोळाचे वर्चस्व होते आता या निवडणुकीत मात्र इतर आडनावाचा  उमेदवार  देणाऱ्या गटाला पाठींबा देईचा असा निर्णय प्रा.रामदास झोळ यांनी घेतला असल्याने त्यांची भुमिका निर्णयाक ठरणारी आहे. . त्यानंतर आता प्रा. रामदास झोळ ग्रामविकास पॅनलने या निर्णयाचे स्वागत करत ज्येष्ठ नागरिक भानुदास गोपीनाथ टापरे या नावाला बिनविरोधसाठी पाठींबा दर्शवला आहे. .वाशिंबे ग्रामपंचायत बिनविरोध केल्यास १० लाख विकास निधी दिला जाईल असे जाहीर आवाहन प्रा. रामदास झोळ यांनी केले होते. त्यानंतर झोळ आडनाव सोडून जो गट इतर आडनावाचा उमेदवार देईल त्याला पाठींबा दिला जाणार आहे, असा निश्चियच करण्यात आला. काही कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला होता.वाशिंबे ग्रामपंचायत निवडणुकीत झोळ यांच्यासह पवार, शिंदे, टापरे, मगर, वाळुंजकर, यादव, वाघमोडे, जाधव, घोगरे, वजरे, जगदाळे, डोंबाळे, गायकवाड, रंदवे, भुईटे आदी मतदारांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. गावातील प्रमुख नेत्यांनी तालुका पातळीवर जाऊन राजकारण करावे व येथे इतर लोकांमधील उमेदवार जाहीर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली बागल पाटील संजयमामा शिंदे गटाची माणसे या पॅनलमध्ये आहेत सर्वसमावेशक विचार करुन एकत्र आलै आहेत. प्रा. रामदास झोळ, नितीन जगदाळे, भानुदास टापरे, हरीचंद्र मगर, बागल गटाचे गणेश झोळ, भाजपचे अमोल पवार, अँड. भाऊसाहेब झोळ, संतोष वाळूंजकर, कल्याण मगर, आप्पा मगर यांच्यात एक बैठक झाली. दरम्यान काही कार्यकर्त्यांशी चर्चाही झाली होती. दरम्यान प्रा. रामदास झोळ ग्रामविकास पॅनेलने भानुदास गोपीनाथ टापरे या नावाला बिनविरोधसाठी पाठींबा दर्शिवला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group