Thursday, July 31, 2025
Latest:
करमाळा

बागल गटात इन्कमिंग सुरू उंदरगाव येथील धुळाजी कोकरे कैलास कोकरे यांचा पाटील गटातून बागल गटात जाहीर प्रवेश

प्रतिनिधी वाशिंबे.
उंदरगाव ता.करमाळा येथील धुळाजी कोकरे,कैलास कोकरे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी नारायण पाटील गटातून बागल गटात मकाई सहकारी साखर कारखाना चेअरमन दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.यावेळी कोकरे यांनी बोलताना सांगितले कि साखर संघाच्या संचालिका रश्मी दिगंबरराव बागल,मकाई सहकारी साखर कारखाना चेअरमन दिग्विजय दिगंबरराव यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण बागल गटात प्रवेश करत आहोत.बागल गटाच्या नेत्यां रश्मी दीदी बागल यांना आमदार करण्यासाठी उंदरगाव परिसरातील सर्व कार्यकर्ते कटीबद्ध आहोत.यावेळी मकाई सहकारी साखर कारखाना नुतन संचालक बाळासाहेब पांढरे,सतिष नीळ,रेवन्नाथ निकत,गणेश झोळ,बापू चोरमले,संतोष पाटील,प्रवीण सरडे,आशिष गायकवाड,अजित झांजूर्ने, रामभाऊ हाके,साधना खरात,आबा करगळ, काशीनाथ काकडे,देवा ढेरे,आदी बागल गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.

*जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील मातब्बर करणार बागल गटात प्रवेश*.
*सतीश नीळ यांनी दिली माहीती*.

करमाळा तालुक्यातील गावपातळीवरील अनेक नेते मंडळी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर बागल गटात लवकरच प्रवेश करणार असल्याची माहिती सतीश नीळ यांनी दिली आहे. करमाळा तालुक्यातील बागल विचाराला मानणारे अनेक कार्यकर्ते सुबह का भूला शाम को घर आये उसे भूला नही कहते या उक्ती प्रमाणे थोड्याच दिवसात बागल गटात दाखल होतील.करमाळा तालुक्याच्या स्वाभीमानी नेत्या रश्मी दीदी बागल.मकाई सहकारी साखर कारखाना चेअरमन दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत करमाळा तालुक्यातील मातब्बर मंडळी बागल गटात प्रवेश करणार आहेत.असेही सतीश नीळ यांनी सांगितले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
Join-News