करमाळाराजकीयसकारात्मक

करमाळा तालुक्यातील उजनी प्रकल्पांतर्गत पुनर्वसीत गावठाणांसाठी 2 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर . आ. संजयमामा शिंदे यांची माहिती.

करमाळा प्रतिनिधी
उजनी प्रकल्पाअंतर्गत मौजे वांगी एक खातगाव नंबर दोन, सोगाव पश्चिम, रिटेवाडी, वांगी नंबर 2 व कविटगाव या पुनर्वसित गावठाणामधील नागरी सुविधा कामांसाठी 2 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती करमाळा मतदार संघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली
वांगी नंबर 1 येथे सिमेंट काँक्रेट गटर बांधणे या कामासाठी 16 लाख 8 हजार 688 रुपये, खातगाव नंबर 2 येथे सिमेंट काँक्रेट गटार बांधण्यासाठी 25 लाख 59 हजार 95 रुपये, पोमलवाडी येथे सिमेंट काँक्रीट गटार बांधण्यासाठी 43 लाख 98 हजार 280 रुपये तसेच पोमलवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी 13 लाख 63 हजार 595 रुपये ,सोगाव पश्चिम येथे अंतर्गत खडीकरण कामासाठी 34 लाख 85 हजार 49 रुपये, रिटेवाडी येथे अंतर्गत खडीकरण कामासाठी 15 लाख 3 हजार 928 रुपये ,वांगी नंबर 2 येथे सिमेंट काँक्रीट गटार बांधकामासाठी 17 लाख 2हजार 539 रुपये, कविटगाव येथे स्मशानभूमी पोहोच रस्ता व अंतर्गत खडीकरण कामासाठी 53 लाख 48 हजार 832 रुपये असा एकूण 2 कोटी 19 लाख 70 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार संजय मामा शिंदे यांनी दिली.
दिनांक 29 जुलै 2022 च्या शासन निर्णयानुसार सदर कामांसाठी प्रशासकीय मान्यता मिळालेली असून पुनर्वसीत गावठाणा मधील प्रलंबित कामासाठी हा निधी उपयुक्त असल्यामुळे या भागातील प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. आमदार संजयमामा शिंदे यांनी या गावांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल या गावातील ग्रामस्थांकडून आमदार संजय मामा शिंदे यांचे आभार मानले जात आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group