ओबीसी विद्यार्थ्यांना लागू असलेल्या शैक्षणिक सवलती मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही लागू कराव्यात -प्रा .रामदास झोळ सर*
करमाळा प्रतिनिधी ओबीसी विद्यार्थ्यांना लागू असलेल्या शैक्षणिक सवलती मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही लागू कराव्यात इतर मागासवर्गीय प्रवर्गाला लागू असलेल्या शैक्षणिक सवलती मराठा प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना लागू कराव्यात. असे मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांना दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा रामदास झोळ सर यांनी आज दिले. तसेच SEBC व OBC विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2025 -26 मध्ये जात पडताळणी सर्टिफिकेट सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ द्यावी यासंबंधीचा GR लवकरात लवकर काढावा. अशी विनंती प्राध्यापक झोळ सर यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना केली. यावेळी या निवेदनातील दोन्हीही मुद्द्यांवर व जात पडताळणीसाठी 6 महिन्याची मुदतवाढ देणे हे प्रश्न तात्काळ मार्गी लावू असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे.


