Thursday, April 24, 2025
Latest:
करमाळा

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे व इतर मागण्यांसाठी बहुजन संघर्ष सेनेने करमाळा तहसील कार्यालयासमोर भव्य निदर्शने


करमाळा प्रतिनिधी : बहुजन संघर्ष सेनेने सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे व इतर मागण्या साठी बहुजन संघर्षनेचे संस्थापकापक जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली विविध गावचे सरपंच व शेतकऱ्यांनी तहसील कचेरीसमोर भव्य निदर्शने केली निदर्शने करणाऱ्यांच्या मागण्या सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, वादळाने पडलेल्या केळीची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, तालुक्यातील कारखान्यांनी ऊस गाळपासाठी नेलेले उसाचे बिल एफआरपीप्रमाणे पूर्ण मिळाले पाहिजे, तहसील कचेरीतील पुरवठा विभागामधील सर्वर डाऊन आहे तो सुरळीत चालू करून रेशन कार्डच्याा संदर्भातील नावे समाविस्ट करणे नावे कमी करणे व नवीन रेशन कार्ड मिळणे व पात्र नवीन रेशन कार्ड अन्नसुरक्षेमध्येे समाविष्ट करून धान्य मिळण्याची व्यवस्था करावी, सातबारा दुरुस्तीचे अर्ज दोन वर्षापासून तहसील कचेरी मध्ये पडून आहेत ती कामे व्हावीत व दप्तर दिरंगाईची कारवाई व्हावी,
मार्केट कमिटी करमाळा येथील निलाव मुका न करता बोलून केला पाहिजे.
या सर्व मागण्या घेऊन बहुजन संघर्ष सेनेने करमाळा तहसील कचेरीसमोर भव्य निदर्शने केली सदर निदर्शनाचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या नावे देण्यात आले निवेदन नायब तहसीलदार गायकवाड यांनी स्वीकारले वरिष्ठांना कळवतो असे सांगितले याच्यावर आंदोलन कर्त्यांचे समाधान न झाल्याने राजाभाऊ कदम यांनी तहसीलदार यांना तहसील कचेरीतील सातबारा संबंधित व रेशन कार्ड संबंधित कामे एक महिन्यामध्ये सुरळीत करा अन्यथा शेतकऱ्यांना व नागरिकांना घेऊन तहसीलदार यांच्या खुर्चीला घेराव घालू असा इशारा दिला प्रशासनाला एक महिन्याची मुदत दिली तहसील कचेरीतील सर्व कामे सुरळीत मार्गी लागण्या साठी आंदोलन कर्त्यांनी मागण्याचे फलक हातातात घेऊन घोषणा देत परिसर दणणून सोडला.
अन्दोलनात सहभागी शेतकरी कार्येकर्ते सोमनाथ देवकाते सरपंच आळसुंदे,अविनाश मोरे सरपंच खातगाव, भगवान डोंबले मा.सरपंच वाशिंबे,दत्ता चव्हाण साडे उप सरपंच, राजाभाऊ भोसले सरपंच राजुरी,गणेश रामचन्द्र घोरपडे सरपंच वारकातणे, अनिल मस्कर उपसरपंच वरकटणे, मनोहर कोलिंगे सरपंच पोंधवडी, विष्णू रंदवे सरपंच पोत्रे, नवनाथ राक्षे सरपंच दिलमेश्वर,आबा गायकावड, सुनील गरड, संतोष पाटील, बाप्पू रिटे पाटील, सुभाष गायकवाड, प्रताप पारेकर, सचिन कदम, प्रवीण भोसले, कल्याण कोठावळे, लालमन भोई, प्रदीप शिंदे, उत्तरेश्वर चव्हाण, नितीन गायकवाड, राजू शिंदे, आबा कदम , आप्पा भोसले, विक्रम कांबळे, जितेंद्र लांडगे, दादा थोरात, दत्ता राक्षे, बाबासाहेब कोपनर, रामा दुकळे, साहेबराव झिंजाडे महादेव कडाळे, हनुमंत खरात, चंद्रशेखर गाडे, निलेश पडोळे सागर मार्कड नितीन मारकड, भीमराव कदम, दिगंबर हजारे, अर्जुन भोसले मयूर शिंदे ,श्रीनिवास चौधरी, विकी कांबळे, महादेव काडाले,उतरेशोर चव्हाण,दीपक लोंढे,सिद्धार्थ गायकवाड,बाळू मस्तूद,रमेश भोसले दादा कदम उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group