लोकशाहिर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी – मनोज राऊत
करमाळा प्रतिनिधी लोकशाहिर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे असे मत मत गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी व्यक्त केले.
आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पंचायत समिती कार्यालय येथे बोलत होते. दलित महासंघ करमाळा तालुका यांच्या तर्फे साहित्यरत्न डॉ. आण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती पंचायत समिती कार्यालयामध्ये साजरीकरण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, पत्रकार दिनेश मडके, समाज कल्याणचे गोरख खंडागळे दिनेश काळे, अविनाश जरांडे, गणेश गव्हाणे मच्छिंद्र रासकर संतोष कळसे पंचायत समितीचे सर्व कर्मचारी दलित महासंघाचे तालुकाध्यक्ष दीपक आरणे, ता.संघटक प्रदीप आल्हाट, शहराध्यक्ष वैजीनाथ जाधव व दलित महासंघ जेऊर युवा नेता अशोक दादा कसबे, दलित महासंघ पदाधिकारी व मातंग एकता आंदोलन व मातंग अन्याय अत्याचार निवार संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना मनोज राऊत साहेब म्हणाले की जग बदल घालूनी घाव, सांगुनी गेले मज भीमराव” समाजाला एक नवी दिशा देण्याचे कार्य अण्णाभाऊ साठे तयांच्या साहित्यातून घडले. उपेक्षित समाजातील जनमानसाचा आवाज उठवण्याचे काम त्यांच्या लेखनीतून झाले. आपल्या अजरामर साहित्यिक कृतीतून त्यांनी महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणले आहे. त्यांचा आदर्श घेऊन समाजांनी वाटचाल केल्यास समाजाची प्रगती नक्कीच होणार असल्याची त्यांनी सांगितले.
