हिसरे येथील युवा कार्यकर्ते पैलवान देवा भाऊ खताळ यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड
करमाळा प्रतिंनिधी
क्रांतिकारी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी श्री बाबासाहेब आदिनाथ खताळ यांची निवड संस्थापक अध्यक्ष मा. बाळासाहेब बाबुराव कोळसे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांची निवड करण्यात आली
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी हितासाठी आपण सदैव तत्पर राहणार असून व संघटनेचे प्रमाणिकपणे काम करणार व संस्थापक अध्यक्ष व वरिष्ठांना विश्वासात घेऊन संघटनेची प्रतिमा उंचावण्यासाठी संघटना वाढीसाठी आपण सदैव लढत राहणार आहे असे नूतन प्रदेशाध्यक्ष श्री बाबासाहेब अजिनाथ खताळ यांनी सांगितले.यावेळी अनेक मान्यवर व शेतकरी बांधव उपस्थित होते.पुढील कार्यास नूतन प्रदेशाध्यक्ष यांना सर्वांच्या वतीने क्रांतिकारी शुभेच्छा देण्यात आल्या .
