करमाळाकृषी

करमाळा तालुक्यात पावसाने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी सौ- लक्ष्मी सरवदे

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी घारगाव ग्रामपंचायतच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ लक्ष्मी संजय सरवदे यांनी मागणी केली आहे. करमाळा तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमध्ये शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास, निसर्गाच्या कृपेमुळे वाया गेला, शेतकऱ्यांचे शेतामध्ये पाणीच पाणी झाले, पिकामध्ये दलदल निर्माण झाली म्हणून पिके वाया गेली. काही शेतकऱ्यांची शेती वाहून गेली, आलेल्या पिकांचे नुकसान झाले, फळबागांचे नुकसान झाले, त्यामुळे एकही पीक शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही. त्यामुळे करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी घारगावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ. लक्ष्मी संजय सरवदे यांनी केली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group