करमाळ्याचे विकासप्रिय आमदार संजयमामा शिंदे यांच्या शुभहस्ते सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री बाळासाहेब नरारे सर यांचा सत्कार
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याचे आमदार श्री संजयमामा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य मा बाळासाहेब नरारे सर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सुरु सुधा संगीत समारोह आणि पुरस्कार वितरण सोहळा 2024 गुरुप्रसाद मंगल कार्यालय करमाळा येथे संपन्न झाला. आमदार संजय मामा शिंदे यांच्या शुभहस्ते व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांच्या तर्फे श्री नरारे सरांच्या वाढदिवसानिमित्त फेटा बांधून सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. करमाळा सारख्या शहराच्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून कत्थक च्या माद्यमातून संगीत जिवंत ठेवण्याचे काम श्री बाळासाहेब नारारे सरांनी ठेवले आहे याचा अभिमान संपूर्ण तालुक्याला आहे. करमाळा शहरात असे भव्य दिव्य सांस्कृतिक कार्यक्रम घेता यावेत यासाठी आपण शहरात लवकरच सांस्कृतिक भवन उभारणार असल्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी सांगितले. परराज्यातून आलेल्या सर्व पाहुण्यांचे त्यांनी स्वागत करून त्यांना पुरस्कार प्रदान केले. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ नेते विलासरावजी घुमरे सर, जेष्ठ पत्रकार ॲड. बाबुरावजी हिरडे, गटशिक्षण अधिकारी मा श्री राजकुमार पाटील, प्रदूषण महामंडळाचे सहसंचालक मा श्री दत्तात्रय देवळे, यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष मा श्री गणेश करे पाटील, डॉ. सौ. कविता कांबळे तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव व नागरिक उपस्थित होते.
