कामगार नेते स्व सुभाष आण्णा सावंत यांचा समाजकारणातुन राजकारणाचा जनसेवेचा वारसा चालवण्याचे सावंत गटाचे काम प्रेरणादायी-ॲड बाबुराव हिरडे
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात कष्टकरी शेतकरी हमाल सर्वसामान्य जनता यांना स्व सुभाष आण्णा सावंत यांनी न्याय देण्याचे काम केले असून स्व.आण्णांचा यशस्वी वारसा चालवण्याचे त्यांची भावी पिढी यशस्वीपणे करत आहे.सावंत गटाचे समाजकारणतुन राजकारण करणाचे कार्य प्रेरणादायी असुन त्यांच्या कार्यास करमाळा तालुका पत्रकारांचा सदैव पाठींबा राहिल असे मत ज्येष्ठ पत्रकार ॲड बाबुराव हिरडे यांनी व्यक्त केले.
पत्रकार महर्षी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनानिमित्त करमाळा तालुका पत्रकारांचा सन्मान सत्कार समारंभ सावंत गटाच्या वतीने करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार ॲड बाबुराव हिरडे व्यासपीठावर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंचायत समिती सदस्य ॲड राहुल सावंत, कर्तव्यदक्ष नगरसेवक संजय आण्णा सावंत, भोसेचे माजी सरपंच भोजराज सुरवसे सावंत गटाचे युवा नेते सुनील बापु सावंत,जेष्ठ पत्रकार अशोक नरसाळे मुस्लिम समाजाचे नेते फारूख जमादार, माजी नगरसेवक दीपक सुपेकर उपस्थित होते.
सावंत गट एक कौटुंबिक जिव्हाळा जपणारा असुन प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन त्यांच्या कौटुंबिक तंटे सोडवत जनसामान्याचे प्रश्न सोडवुन आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून अनेक कुटुंबे सुखी करण्याचे काम केले आहे.पैसा सर्वांकडे असतो पण खऱ्या अर्थाने दातृत्वाची भुमिका घेऊन काम करणारे सावंत कुटुंब असल्याने जनतेमध्ये त्यांच्याविषयी आपुलकीची भावना आहे.करमाळा तालुका राजकारणात महत्वाची भुमिका बजावणाऱ्या सावंत गटाचे भवितव्य उज्ज्वल आहे.करमाळा तालुक्याचे नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्याकडे असल्याने त्यांच्या कार्यास पाठबळ देणे गरजेचे आहे.संकटकाळात हाकेला ओ देत संकटमोचकाची भुमिका बजावत सर्वाना मदत करणाऱ्या सावंत गटाने करमाळा तालुका पत्रकार बांधवांना असेच प्रेम सहकार्य पाठबळ द्यावे. पत्रकार बांधवाचे आपणास सदैव पाठींबा असुन आम्ही समाजकारण राजकारणात आपल्या बरोबर राहून साथ देणार असल्याचे ॲड बाबुराव हिरडे यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या सुरूवातीला कामगार नेते हमाल पंचायत संस्थापक अध्यक्ष स्व.सुभाष आण्णा सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी जेष्ठ पत्रकार नासीर कबीर अशोक नरसाळे पत्रकार किशोरकुमार शिंदे सुनील भोसले सुहास घोलप यांनी मनोगत व्यक्त केले.स्व.सुभाष आण्णा सावंत यांच्या कार्याला उजाळा देऊन त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सावंत गटाच्या सामाजिक राजकीय भावी पिढीच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार ॲड बाबुराव हिरडे नासीर कबीर अशोक नरसाळे आशपाक सय्यद अलीम शेख दिनेश मडके अशोक मुरूमकर विशाल घोलप सुहास घोलप, सचिन जव्हेरी सागर गायकवाड नागेश चेंडगे अविनाश जोशी नितीन घोडेगावकर विशाल परदेशी सिध्दार्थ वाघमारे नानासाहेब पठाडे यांचा मानाचा फेटा श्रीफळ गुलाब पुष्प लेखणी देऊन ॲड राहुल सावंत संजय आण्णा सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ पत्रकार अशोक नरसाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन फारूख जमादार यांनी मानले. या कार्यक्रमास श्रीकांत ढवळे सागर सामसे,बापू उबाळे वालचंद रोडगे उपस्थित होते.