Tuesday, April 22, 2025
Latest:
आरोग्यकरमाळासकारात्मक

करमाळा शहराचे मा. नगराध्यक्ष स्वच्छतादूत वैभवराजे जगताप यांच्या वाढदिवसानिम्मित महास्वच्छता अभियान

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहराचे माजी नगराध्यक्ष स्वच्छतादूत वैभवराजे जगताप यांनी करमाळा शहरात त्यांच्या 30 ऑगस्ट रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त करमाळा शहरात महास्वच्छता अभियानाची सुरुवात केली आहे. त्यासाठी पंढरपूर वरून 50 ते 60 जणांची स्वच्छतेसाठी स्वखर्चातून टीम आणली आहे.या अभियनाअंर्तगत सावंत गल्ली काकडे गल्ली मोहल्ला कन्या शाळा कुंकु गल्ली वेताळपेठ या भागातली स्वच्छता केली आहे. वैभवराजे जगताप यांनी तेथील नागरिकांचे प्रश्न जाणून घेऊन सोडवण्यात आले आहे. त्यावेळी माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे उपनगराध्यक्ष अहमदचाचा कुरेशी, बाळासाहेब बलदोटा, सचिन अब्दुले सर, अतुल देवकर, महादेव सांगवीकर, बाळासाहेब कांबळे उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group