Monday, April 21, 2025
Latest:
करमाळासहकार

श्री आदिनाथ साखर कारखान्याचा गळीत हंगाम लवकरच सुरू करणार- चेअरमन धनंजय डोंगरे

करमाळा प्रतिनिधी  श्री आदिनाथ साखर कारखाना हे तालुक्यातील उस उत्पादक शेतकरी सभासदांचे मंदिर आहे, व या पवित्र मंदिरामध्ये आम्ही सर्वांचे सहकार्याने मिळून काम करीत आहोत आदिनाथ ही करमाळा तालुक्यातील पहिली सहकारी संस्था असून यावर हजारो लोकांचा संसार अवलंबून आहे, याची जाणीव आम्हाला आहे आदिनाथ सुरू व्हावा ही तमाम सभासदांची इच्छा आहे, कारखान्याचे मशीनरी दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले असून लवकरच आदिनाथ कारखान्याचा उस गळीतास प्रारंभ होणार असून कोणतेही कामगार काम सोडून गेलेले नव्हते, काही जण जाणूनबुजून दिशाभूल करुन कारखाना सुरू होणार नाही अशा अफवा सभासदांमध्ये पसरवीत आहेत त्यावर विश्वास ठेवू नका असे आवाहन आदिनाथचे चेअरमन धनंजय डोंगरे यांनी केले आहे. मागील तीन वर्ष आदिनाथ साखर कारखाना बंद असल्याने या हंगामामध्ये कारखाना चालू होणार नाही अशी परिस्थिती असताना तालुक्यातील सर्वांच्या सहकार्यामुळे आम्ही कारखाना चालू करु शकत आहोत यासाठी आम्हाला माजी आमदार नारायणआबा पाटील तसेच आमच्या नेत्या रश्मीदिदी बागल यांचे मार्गदर्शन लाभत आहे ही आम्हाला अतिशय आनंद देणारी व अभिमानास्पद गोष्ट आहे असे आम्हाला वाटते व हे केवळ आम्ही शक्य करु शकलो ते आदिनाथ कारखान्याच्या हितचिंतकाच्या सहकार्याने ही गोष्ट आम्ही विसरू शकत नाही. यामुळे अफवा पसरवणा-यांना आमची विनंती आहे की वैयक्तिक व्देषापोटी चूकीची माहिती पसरवू नका आणि आमच्या पत्रकार बंधुना विनंती आहे की बातम्यांची सत्यता पडताळून पहावी व बातमी प्रसिद्धि करावी असे त्यांनी म्हटले आहे. तसेच चालू गळीत हंगामात आम्ही सभासदांना न्याय देण्यास बांधील आहोत असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group