प्राचार्य जयप्रकाश बिले सर यांचे भाचे विश्वराज हॉस्पिटलचे प्रमुख हृदयरोग तज्ञ डॉ.सुरज इंगोले यांची झी चोवीस तासवर आज दुपारी साडेतीन वाजता मुलाखत*
*करमाळा प्रतिनिधी प्राचार्य जयप्रकाश बिले सर यांचे भाचे हृदयरोग तज्ञ डॉ.सुरज इंगोले यांची झी चोवीस तास वर आज मुलाखत संप्पन होणार आहे करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळयाचे माजी प्राचार्य भैरवनाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयप्रकाश बिले सर यांचे भाचे कोल्हापूर येथील रहिवासी असलेले सध्या विश्वराज हॉस्पिटलचे प्रमुख व हृदयरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहेत .डॉक्टर सुरज इंगोले यांची महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी झी 24 तास या चॅनलवर नऊ जानेवारी 2024 रोजी दुपारी साडेतीन वाजता हृदयाची काळजी या विषयावर मुलाखत संपन्न होणार आहे. करमाळा तालुक्यातील नागरिकांनी ही मुलाखत पाहण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य जयप्रकाश बिले सर यांनी केले आहे.
