सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते देशभक्त कै नामदेवरावजी जगतापसाहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
करमाळा प्रतिनिधी -सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते देशभक्त कै नामदेवरावजी जगताप (साहेब) यांच्या जयंती दिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.त्यांना यशवंतराव चव्हाण साहेबांचे मानसपुत्र संबोधले होते.
त्याकाळी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात त्यांचा दबदबा होता.करमाळा तालुक्यातील विकासकामा सोबत उजनी धरण निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा होता.यशवंतराव चव्हाण महाविद्यालय… महात्मा गांधी विद्यालय, कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना करून हजारो लोकांना त्यांनी रोजी रोटीची व्यवस्था करून दिली.सोलापूर जिल्हा बँकेचे ते पहिले अध्यक्ष होते.अश्या या महान मानवाची आज जयंती साजरी होत असताना चिंतामणी दादा जगताप, राहुल भैया जगताप, प्रतापराव जगताप, सुजय जगताप,सचिन कटारिया, उत्तरेश्वर सावंत, योगेश राखुंडे, गीतेश लोकरे, गणेश फलफले, नितीन चोपडे, किरण साळुंखे यांच्या वतीने देशभक्त नामदेवरावजी जगताप साहेब यांच्या पवित्र स्मृतीस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.