बहुजन मराठी पत्रकार संघ शाखा करमाळा यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांनचा सन्मान सोहळयाचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी
बहुजन मराठी पत्रकार संघ शाखा करमाळा यांच्या वतीने 10 वी 12 वी गुणवंत विद्यार्थ्यांनचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात येणार आहे , दिं 17/6/2023 शनिवारी सकाळी 11:35 वा पंचायत समिती सभाग्रह येथे सन्मान सोहळा होणार असून हा सन्मान सोहळा करमाळा तालुक्यातील सर्व अधिकारी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत विद्यार्थीसह पालक शिक्षक याचा सन्मान होणार आहे, दहावी आणि बारावी बोर्ड परिक्षेत पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांक, मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बहुजन मराठी पत्रकार संघ शाखा करमाळा यांच्या वतीने तालुक्यातील सर्व अधिकारी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात येणार असल्याचे बहुजन मराठी पत्रकार संघ शाखा करमाळा यांच्या वतीने सांगण्यात आले, व या कार्यक्रमासाठी तालुक्यातील विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले.