दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये महाराष्ट्र खेळ दिवस साजरा
भिगवण प्रतिनिधी: दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी, स्वामी चिंचोली तालुका दौंड जिल्हा पुणे येथील औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र खेळ दिवस मध्ये उत्साहाने भाग घेतला.दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री प्राध्यापक रामदासजी झोळ सर, उपाध्यक्ष श्री राणादादा सूर्यवंशी साहेब, सचिवा सौ माया झोळ मॅडम व चीप ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिसर श्री डॉक्टर विशाल बाबर सर व प्राचार्य श्री डॉक्टर जेडगे सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र खेळ दिवस व महाराष्ट्रातील खेळ आणि खेळातील संधी बद्दल मार्गदर्शन केले. तसेच प्राध्यापक राम निखाते सर आणि प्राध्यापक वाळके सर यांनी महाराष्ट्र खेळ दिवस या दिवशी विद्यार्थ्यांना विविध खेळाबद्दल माहिती देऊन विविध खेळाचे आयोजन करून ते योग्यरित्या पार पाडले.
