करमाळा

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था व जाधव-पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने १ फेब्रुवारी रोजी मुळव्याध शिबीराचे आयोजन

.         करमाळा प्रतिनिधी :
आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था व जाधव-पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मुळव्याध (पाईल्स) तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात करमाळा व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मुळव्याध तज्ज्ञ डॉ. प्रदीप तुपेरे (एम.बी.बी.एस., एम.एस. – जनरल सर्जन) हे उपस्थित राहून रुग्णांची तपासणी, सल्ला व उपचार करणार आहेत. मुळव्याध हा आजार अनेकदा दुर्लक्षित केला जातो; मात्र वेळेत उपचार केल्यास तो सहज बरा होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
शौचमार्गास खाज येणे, गुदद्वाराभोवती सूज होणे, शौचावाटे रक्त जाणे, गाठी पडणे अशी लक्षणे असलेल्या रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये मुळव्याधीच्या पहिल्या व दुसऱ्या अवस्थेसाठी अत्याधुनिक इंजेक्शन (स्क्लेरोथेरपी) तसेच लेझर उपचार पद्धती सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या उपचारासाठी शस्त्रक्रियेची किंवा रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता नसून, कमी वेळेत व वेदनारहित उपचार शक्य आहेत.
इंजेक्शन उपचारासाठी रुग्णांनी किमान ५ तास उपाशी पोटी येणे आवश्यक असून, मधुमेह किंवा रक्तदाब असल्यास डॉक्टरांना पूर्वकल्पना देणे गरजेचे आहे. रुग्णांनी सकाळी ८ ते १० या वेळेत जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये उपस्थित राहावे.
हे शिबिर जाधव-पाटील हॉस्पिटल, अर्बन बँक शेजारी, मेन रोड, करमाळा येथे होणार असून, या शिबिरासाठी पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे.
शिबिरासाठी नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी
मो. 7559214551, 8329459591, 8975676020, 7507314133
तसेच दूरध्वनी (02182) 299611 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजक संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!