सुरताल संगीत विद्यालयाच्या वतीने संगीत महोत्सवाचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील सुरताल संगीत विद्यालयाच्यावतीने संगीत महोत्सवाचे आयोजन रविवारी नऊ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. करमाळा येथील प्राथमिक शिक्षक जिल्हा सोसायटी पतसंस्था, देवीचा रोड येथे दुपारी आडीच वाजता कार्यक्रम होणार आहे. यामध्ये गायन, वादन आणि नृत्य या तिन्ही कलांचा संगम श्रोत्यांना अनुभवायला मिळणार आहे. यावेळी कथक नृत्यांगना कांचन पालकर पुणे, अभिप्सा नंदी पश्चिम बंगाल, सौमिली घोष पश्चिम बंगाल यांचे नृत्य सादरीकरण होणार आहे. विजया कांबळे कोल्हापूर यांचे सरोद वादन होणार असून त्यांना तबलासाथ प्रकाश शिंदे हे करणार आहेत. याशिवाय सुरताल संगीत विद्यालयातील विद्यार्थी व विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे हे आपली कला सादर करणार आहेत. हे सादरीकरण करत असताना ज्यांच्या दोन लस पूर्ण झाले आहेत अशां मोजक्या श्रोत्यांना प्रवेश दिला जाणार आहे. सोशल डिस्टन्स चे पूर्ण पालन करून हा कार्यक्रम करण्यात येणार असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी दिली.
