Monday, April 21, 2025
Latest:
करमाळा

भैरवनाथच्या चाव्या प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्याकडे असल्यामुळे आता त्यांनाच पकडाव लागेल-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या नियोजनामुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा यशस्वी

 

करमाळा प्रतिनिधी

बहुचर्चित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने शेतकऱ्यांच्या साक्षीने पार पाडला या सर्व कार्यक्रमाची सूक्ष्म नियोजन प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी केले होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत सतत पाच दिवस सकाळीअकरा वाजता कारखाना स्थळी आल्यानंतर संध्याकाळी घरी परत जात होते
मंडप रंग रंगोटी स्टेज जेवणाची नियोजन मान्यवरांची सत्कार डिजिटल जाहिराती प्रसिद्धी पत्रिका नियोजन बाबीची नियोजन केले प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी केली होती
कार्यक्रमासाठी करमाळा तालुक्यातील प्रत्येक भागातून ऊस उत्पादक शेतकरी हजर राहण्यासाठी गाड्यांची नियोजन करण्यात आले होते. आरोग्यमंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत यांनी आदिनाथ सरकारी साखर कारखाना बारामती ॲग्रो च्या तावडीतून सोडण्यासाठी जवळपास 13 कोटी रुपयांची रक्कम आदिनाथ कारखान्याच् खात्यावर भरून भाडेपट्टा कराराची प्रक्रिया थांबवलीया कार्यक्रमावेळीभाषणात सुद्धा आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत सावंत यांनी मी निमित्त मात्र असून भैरवनाथ शुगर चे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनीच 13 कोटी रुपयांची मदत केल्याची जाहीरपणे सांगून भैरवनाथ इंडस्ट्रीजच्या सर्व चाव्या प्राध्यापक शिवाजीराव च्या ताब्यात आहेत असे सांगितले
हा धागा पकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले की भैरवनाथ इंडस्ट्रीजच्या चाव्या प्राध्यापक शिवाजी सावंतकडे असतील तर आता इथून पुढे प्राध्यापक शिवाजीरावलाच धरावे लागेल अशी कोपरखळी मारून सभेत हास्यविनोद केला.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group