Thursday, April 17, 2025
Latest:
Uncategorized

ज्येष्ठ पत्रकार कुणबी समाजाचे नेते संपादक अशोकराव गुंजाळ यांचा “पञकारीता जीवनगौरव” पुरस्काराने सन्मान

करमाळा प्रतिनिधी अंबाजोगाई पत्रकार संघाच्या वतीने कुणबीभुषण कुणबी महाराष्ट्र राज्याचे सचिव अंबाजोगाई पञकार संघाचे विश्वस्त जेष्ठ पत्रकार अशोकराव गुंजाळ यांना त्यांनी पञकारीता क्षेत्रात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना “पञकारीता जीवनगौरव पुरस्कार” दि.६ जानेवारी २०२३ रोजी अंबाजोगाईत दर्पण दिन कार्यक्रमात सदरील पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. दि.६ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता लोकनेते विलासरावजी देशमुख सभागृह, नगरपरिषद कार्यालय, वरचा मजला, अंबाजोगाई (जि.बीड) येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पञकारीता जीवनगौरव पुरस्कार स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे वितरण या बाबत चर्चा होवून सर्वानुमते ठरले. बैठकीस पत्रकार संघाचे अध्यक्ष अभिजीत गाठाळ हे होते. तर यावेळी अंबाजोगाई पञकार संघाचे मार्गदर्शक अविनाश मुडेगावकर, मार्गदर्शक प्रकाश लखेरा, सचिव रणजित डांगे, सदस्य देविदास जाधव, सदस्य वाजेदभाई शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती.ज्येष्ठ पत्रकार संपादक अशोकराव गुंजाळ यांचा “पञकारीता जीवनगौरव”पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल कुणबी मराठा कर्मचारी संघाचे अध्यक्ष प्रा.चंद्रहास गंभीर,कुणबी मराठा समाज सेवा संघ माढा तालुकाध्यक्ष चंद्रकांत गिड्डे कुणबी समाजसेवा संघ तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके सचिव डाॅ.महेश वीर समाजबांधवाच्यावतीने अभिनंदन केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group