अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या वतीने करमाळा येथील कमलादेवी कन्या प्रशालेत वीज अधिनियम 2003 या विषयावर सोलापूर जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न
प्रतिनिधी
24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या वतीने 25 डिसेंबर 2022 रोजी करमाळा येथील कमलादेवी कन्या प्रशालेत वीज अधिनियम 2003 या विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेला पुणे व नाशिक झोन चे वीज तक्रार निवारण मंचा चे अध्यक्ष मा.श्री. अजयजी भोसरेकर सर यांनी सखोल पध्दतीने मार्गदर्शन केले. यासाठी त्यांनी ग्राहक संरक्षण कायदा-2019 व वीज अधिनियम 2003 चा तौलनिक अभ्यास करून कार्यकर्यांना बौध्दीक मेजवानी दिली.
या कार्यक्रमाची सुरुवात ग्राहक गीताने व स्वागत गीताने करण्यात आली. व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक मा. अजयजी भोसरेकर सर , मध्य महाराष्ट्र प्रांताचे उपाध्यक्ष मा. भालचंद्र पाठक सर, मध्य महाराष्ट्र प्रांताचे सह-कोषाध्यक्ष मा. विनोद भरते सर सोलापूर जिल्हा ग्राहक पंचायत चे अध्यक्ष मा. शशिकांत हरिदास सर, जिल्हा संघटक मा. दीपक इरकल सर, जिल्हा उपाध्यक्ष मा. ॲड विजय कुलकर्णी साहेब, जिल्हा सह- संघटक मा. डाॅ मैत्रयी केसकर मॅडम, जिल्हा कोषाध्यक्ष मा. सचिन साखरे साहेब सोलापूर जिल्हा महिला आघाडी प्रमुख मा. माधुरीताई परदेशी इ. मान्यवर उपस्थित होते.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे आराध्य दैवत स्वामी विवेकानंद व भारत मातेच्या प्रतिमेचे प्रतिमा पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोलापूर जिल्हा महिला आघाडी प्रमुख मा. माधुरी ताई परदेशी यांनी मांडले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत करमाळा तालुका अध्यक्ष ॲड शशिकांत नरुटे यांनी केले.
ही कार्यशाळा दोन सत्रात घेण्यात आली. पहिल्या सत्राच्या सुरुवातीला सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या नाव नोंदणी (संपूर्ण कार्यशाळेत एकूण 83 जणांची नोंदणी) करून सर्वांना नाष्ट्याचे नियोजन करण्यात आले. त्यानंतर पहिल्या सत्रात सकाळी 11:00 ते 1:00 या वेळात वीज अधिनियम 2003 वर मा. अजयजी भोसरेकर सर यांचे विविध कलमानुसार उदाहरणाचे दाखले देत सखोल मार्गदर्शन झाले.
दुपारी 1:00 ते 2:00 वेळात मध्यांतर करुन सर्व उपस्थितांनी भोजनाचा आस्वाद घेतला.
दुपारच्या सत्रात 2:00 ते 4:00 वेळात पहिल्या सत्रातातील मार्गदर्शनाशी निगडित निर्माण झालेले व काही वैयक्तिक प्रश्न यावर शंका समाधान (प्रश्नोत्तराचा) घेण्यात आले.
या कार्यशाळेत सोलापूर जिल्ह्य़ातील विविध तालुक्यातून आलेल्या तालुका अध्यक्ष व काही प्रतिनिधींचा जिल्हा अध्यक्ष मा. शशिकांत हरिदास सर व जिल्हा संघटक मा. दीपक इरकल सर यांचे हस्ते गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम समारोपाकडे जात असताना ही जिल्हास्तरीय कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी करमाळा तालुक्यातील सर्व कार्यकर्यांनी व महिला आघाडीतील सर्व महिला सदस्यांनी खूप मेहनत घेतली. आणि हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला. त्यानिमित्ताने या कार्यकर्यांचे ( प्रातिनिधिक स्वरूपात) सोलापूर जिल्ह्याच्या वतीने गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मध्य महाराष्ट्र प्रांताचे उपाध्यक्ष मा. भालचंद्र पाठक सर तसेच मध्य महाराष्ट्र प्रांताचे सह- कोषाध्यक्ष मा. विनोद भरते सर यांनी या कार्यशाळेवर भाष्य करुन कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आपल्या ओघवत्या शैलीत मार्गदर्शन केले.
तसेच या कार्यशाळेत घेतलेल्या ज्ञानाचे उपयोजन कार्यकर्त्यांनी आपल्या ग्राहक पंचायत च्या कामात करण्या संदर्भात मार्गदर्शन मा. शशिकांत हरीदास सर यांनी केले. त्याचबरोबर जिल्हा संघटक मा. दीपक इरकल सर यांनी जिल्ह्य़ातील विविध तालुक्याची होत असलेली सदस्य नोंदणी आणि पुढील वर्षांत संघटनेला 50 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल कार्यकर्त्यांनी संघटनात्मक कार्याला महत्व देऊन काम करण्याचे आवाहन केले.
या कार्यशाळेचे मधूर भाषेत आणि आपल्या काव्य शैलीतून अतिशय गोड असे सूत्रसंचालन तथा निवेदन मा. भिष्माचार्य चांदणे सर यांनी केले.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा. सारीका पुराणिक मॅडम यांनी मांडले. शेवटी सर्वांना समारोपानंतर चहापानाची व्यवस्था करण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मध्य महाराष्ट्र प्रांताचे उपाध्यक्ष मा. भालचंद्र पाठक सरांच्या शिस्तबद्ध नियोजनाने अखिल भारतीय ग्राहक पंचायत करमाळायुनिट च्या सर्व तालुका कार्यकारिणीतील सदस्य व महिला आघाडीतील सदस्यांनी मेहनत घेतली.
