करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या दिपक चव्हाणचा ॲायडाल ॲाफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मान
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याचे सुपुत्र दिपक अरुण चव्हाण यांना करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा म्हणुन दैनिक सकाळच्या वतीने गौरव भुमिपुत्राचा म्हणुन ॲॉयडाल ॲाफ महाराष्ट्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.संघाचा शाखा कार्यकर्ता ते भारतीय जनता पार्टीचा प्रदेश सचिव पदापर्यंत वाटचाल केली आहे.सर्वसामान्य मध्यमवर्गिय कुंटुंबात जन्म घेऊन स्व कर्तृत्वावर त्यांनी संघर्षमय जीवनातुन यशस्वी वाटचाल केली आहे.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे सिनेट सदस्य, रेल्वे उपभोक्ता समितीचे सल्लागार असुन सर्वादय प्रतिष्ठानचे अध्यक्ष असुन या प्रतिष्ठानच्या माध्यमातुन व्याख्यानमाला तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहे.समाजकारणातुन राजकारणात प्रामाणिकपणे निरपेक्षपणे समाजाची निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या व्यक्तीला सन्मान मिळाला असुन त्यांना मिळालेल्या पुरस्कारबद्दल राजपुत युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्रसिंह ठाकुर,कुणबी मराठा समाजसेवा संघाचे अध्यक्ष पत्रकार दिनेश मडके भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे ,शहराध्यक्ष जगदिश आगरवाल ,सरचिटणीस अमरजित साळुंके,जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, यशकल्याणी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, नामदेव शिंपी समाज संघटनेचे अंकुश पिसे,ब्राम्हण संघाचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी सचिव बाळासाहेब होसिंग, सोनार समाजसंघटनेचे मनोज बुराडे, वीरशैव संघटनेचे शेखर स्वामी,बुरुड समाजाचे अध्यक्ष निखिल मोरे यांनी दिपक चव्हाण यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत
