Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळासकारात्मकसामाजिक

डाॅ.दयानंद शिंदे यांनी सामाजिक बांधलिकीच्या भावनेतुन मुकबधीर शाळेत केला चि.अर्जुन याचा वाढदिवस साजरा

करमाळा प्रतिनिधी करमाळ्याचे सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ(हाडांचे) डॉ.दयानंद शिंदे सर यांचे चि अर्जुन मुलाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्रीदेवीचामाळ येथील कमलादेवी मूकबधिर शाळेला सहपरिवार व हॉस्पिटल कर्मचारी यांच्यासोबत भेट देऊन मुकबधिर शाळेतील लहान मुलांबरोबर चि.अर्जुनचा वाढदिवस साजरा केला  खरोखरच ज्या गोरगरीब गरजूवंत व तेही आपल्यातीलच एक आहेत या संकल्पनेतून त्या मुलांना फळे वाटप व अन्नदान करण्याचा कार्यक्रम घेतला. खरंच तेथे गेल्यावर समजलं की आपल्या मदतीची व आधाराची खरी गरज कोणाला असते व कोणाला नसते तेथे गेल्यावर त्या मुलांच्या तब्येतीची त्यांच्या राहणीमानाची व त्यांच्या जीवनशैलीची विचारपूस केली तर खरोखरच असं जाणवलं की कधी वेळ भेटला तर आवर्जून तेथे यावं कारण तेथे गेल्यावर त्या मुलांनी इतकं आपलंसं करून आमच्या संपूर्ण परिवाराचा व सर्व हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचा त्यांच्या पद्धतीने मनापासून स्वागत करण्याची जी पद्धत खरोखरच खूप आवडली व त्यांच्या सोबत मिळून मिसळून अर्जुन चा वाढदिवस साजरा केला. तेव्हा असं ठरवलं की माझ्या आसपासच्या प्रत्येक व्यक्तीचा व परिवारातील प्रत्येक सदस्याचा वाढदिवस असो किंवा आनंदाचा दिवस मी त्यांच्यासोबत जाऊन साजरा केला पाहिजे. कारण तिथे त्यांच्या स्वागताची पद्धत खूपच छान होती तेथे उपस्थित करमाळ्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर शिंदे सर व डॉक्टर शिंदे मॅडम यांनी त्या मुलांना मार्गदर्शन केले व तेथील शिक्षकांना मुलांसंदर्भात कशाची अडचण किंवा गरज लागल्यास संपर्क साधण्याचे आव्हान देखील केले व त्या मुलांच्या आरोग्याचे काळजी घेण्याचे मोलाचे मार्गदर्शन तेथील शिक्षकांना केले. तरी शहरातील व तालुक्यातील लोकांना मी सांगू इच्छितो की आपण एकदा तरी त्या आपल्या जवळील मूकबधिर शाळेला भेट देऊन यावं. – प्रशांत (प्रिन्स) शिंदे .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group