करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा मंगेश चिवटे यांची मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्या अधिकारीपदी निवड
करमाळा प्रतिनिधी करमाळयाचे सुपुत्र मंगेश चिवटे यांची मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. मुंबईतील मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष आहे. सोमवारी (ता. २५) चिवटे हे या कक्षाचा पदभार स्वीकारणार आहेत. चिवटे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मानले जातात. त्यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षात उल्लेखनीय काम केलेले आहे.उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना हा कक्ष कार्यकर्त होता मात्र, अनेक अटींमुळे गरजुंना लाभ मिळू शकला नव्हता. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर १३ मार्च २०१५ पासून या कक्षाची स्थापना झाली होती. सीएसआर रक्कमेतून या कक्षात मदत केली जाते. दारिद्र रेषेखालील रुग्णांना या कक्षातून खर्चाच्या ६० टक्के पर्यंत मदत केली जाते.ओमप्रकाश शेटे हे या कक्षाचे प्रमुख होते. पहिल्या वर्षात या कक्षाने २८ हजार गरजू रुग्णांना ३०२ कोटींची मदत केली. याबरोबर ४५० धर्मदाय रुग्णालयाच्या १० टक्के राखीव खाटांमधून ६०० कोटींचे उपचार झाले होते. या कक्षावर गैरव्यवहावरचे आरोपही झाले होते. त्यामुळे माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी कक्षात फक्त सरकारी अधिकारी नेमले होते. निवडक १० गंभीर आजारांसाठी मदत देण्याची अट टाकली होती. करमाळयाचे सुपुत्र मंगेश चिवटे यांच्या कार्याची दखल घेऊन मुख्यमंत्री विशेष कार्यकारी अधिकारीपदावर त्यांचे सर्वत्र कौतुक अभिनंदन होत आहे.
