गणेश चिवटे यांच्या श्रीराम प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांना मोफत भात – भाजी वाटपाचा उपक्रम कौतुकास्पद पोलिस अधिकाऱ्याचे गौरवद्गागार
करमाळा प्रतिनिधी श्रीराम प्रतिष्ठान करमाळा यांच्या वतीने गेली दहा ते अकरा वर्षापासून अखंडितपणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत भात – भाजी वाटप करण्यात येते.परंतु गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे शाळा व हायस्कूल बंद असल्यामुळे हा कार्यक्रम बंद होता, परंतु आता शाळा व कॉलेज सुरळीत चालू झाल्यानंतर श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत भाजी वाटपाची सुरवात करमाळा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी API जगदाळे व API भुजबळ साहेब यांच्या हस्ते करण्यात आली ,
यावेळी जगदाळे साहेब यांनी विद्यार्थ्यांना त्यांचे अनुभव सांगितले तसेच श्रीराम प्रतिष्ठान व गणेश चिवटे यांचे कार्य हे आदर्शवत आहे, श्रीराम प्रतिष्ठानचे सामाजिक काम पाहिल्यावर समाधान वाटले असे मत त्यांनी व्यक्त केले,
तसेच भुजबळ साहेब यांनी विद्यार्थ्यांना परिस्थितीशी झुंज देत गरुड झेप घेऊन तुम्ही एक दिवस मोठे अधिकारी व्हा ,तुमच्या गावचे व तालुक्याचे नाव रोशन करा असे प्रोत्साहन देत मार्गदर्शन केले, यावेळी श्रीराम प्रतिष्ठानच्या मोफत भात- भाजी वाटप कार्यक्रमास जगदाळे व भुजबळ साहेब उपस्थित राहिल्याबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश चिवटे यांनी त्यांचे स्वागत करून आभार मानले, यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर तात्या जाधव, अनिल अग्रवाल, रायगावचे चेअरमन दासा बापू बर्डे ,विशाल साळुंखे ,शरद कोकीळ, संजय किरवे व विद्यार्थी उपस्थित होते ,
