शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सहकक्षप्रमुख शिवकुमार चिवटे यांच्या अथक प्रयत्नांमधून दोन रुग्णांना नव संजीवनी बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचाराकरीता मिळाले प्रत्येकी दोन लाख रूपये
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सहकक्षप्रमुख शिवकुमार चिवटे यांच्या अथक प्रयत्नांमधून दोन रुग्णांना नवसंजीवनी*
*बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारांकरिता मिळाले प्रत्येकी दोन लाख रुपये मिळाले आहे
ऋषिकेश राजू वाघ (वय २१) रा.लासलगाव ता.निफाड जि.नाशिक हा बोन मॅरो ट्रान्सप्लांट या उपचाराकरिता नाशिक येथील नामको हॉस्पिटल मध्ये अॅडमिट आहे. त्यांच्या उपचाराचा खर्च हा वीस लाख रुपये एवढा होता त्यांची परिस्थिती खूप हलाखीची असल्यामुळे सदरील खर्च त्यांना परवडणारा नव्हता दरम्यान त्यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे कक्ष प्रमुख व महाराष्ट्राचे आरोग्य दूत मंगेश चिवटे यांच्याशी त्यांना संपर्क करायचा होता. त्यांनी त्यांचे करमाळा येथील नातेवाईक अजिंक्य बाळासाहेब महाजन यांच्यामार्फत मंगेश चिवटे यांचे बंधू शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे करमाळा तालुका सहकक्षप्रमुख शिवकुमार चिवटे यांना संपर्क केला होता. शिवकुमार चिवटे यांच्या योग्य मार्गदर्शनाने सदरील पेशंटचे वडील राजू वाघ यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय मदतीसाठी अर्ज केला होता दरम्यान मंगेश चिवटे हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शिवकुमार चिवटे यांनी त्यांचे मित्र गणेश श्रीवास्तव (हलवाई) यांचे बंधू नवनाथ श्रीवास्तव (हलवाई) ह.रा.लासलगाव जि नाशिक यांच्या मार्फत सदरील पेशंटचे वडील राजू वाघ यांची मंगेश चिवटे यांच्याशी भेट घालून दिली होती.त्याचवेळी सदरील अर्जा संदर्भात मंगेश चिवटे यांनी त्यांच्या ऑफिस मधील संबंधितांशी संपर्क करून तात्काळ पेशंट अॅडमिट असलेल्या रुग्णालयास दोन लाख रुपये निधी देण्याचे आदेश दिले होते. तसेच
येरवडा,पुणे येथील पेशंट श्रोती मंगेश धायफुले(वय३२)यांना पण बोन मॅरो ट्रान्सप्लांट च्या उपचाराकरिता सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,पुणे येथे अॅडमिट केले होते त्यांची परिस्थिती बेताची असल्यामुळे सदरील खर्च त्यांना परवडणारा नव्हता. दरम्यान करमाळा येथील नातेवाईक संजय महाजन यांच्याशी संपर्क करून त्यांनी शिवकुमार चिवटे यांच्याशी संपर्क केला होता.चिवटे यांच्या योग्य मार्गदर्शनाने सदरील पेशंटचे पती मंगेश धायफुले यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी अर्ज केला होता.नंतर शिवकुमार चिवटे यांनी योग्य तो पाठपुरावा करून पेशंट अॅडमिट असलेल्या सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,पुणे यांच्या खात्यामध्ये दोन लाख रुपये निधी जमा झाला.यावेळी दोन्ही पेशंटच्या नातेवाईकांनी संवेदनशील मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब , मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख रुग्णसेवक मंगेश चिवटे, सहकक्षप्रमुख शिवकुमार चिवटे यांचे व करमाळा तालुका शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष समन्वयक दीपक पाटणे व वैद्यकीय सहाय्यक रोहित वायभासे यांचे देखील आभार मानले व तसेच या कामी सहकार्य करत असलेल्या डॉ.निलेश देशमुख सर, स्वरूप काकडे सर, अरविंद मांडवकर सर, राहुल भालेराव सर,सागर झाडे सर,दिपाली चव्हाण मॅडम आणि संपूर्ण शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या महाराष्ट्रातील टीमचे गोरगरिबांन प्रति करत असलेल्या आरोग्य सेवेचे कौतुक केले.
